Testimonial Detail

शिवाजी अहिरे

व्यवसाय मालक

मी जेव्हा ‘मार्स गुरुकुल’ जॉईन केलं, तेव्हा माझ्याकडे एकच कस्टमर होता. मला सावंत सर, मराठे सर एकच सांगायचे, की शिवाजी, तू बॅग बिझनेसमध्ये काम करतोय. नंतर मी त्यांचा ‘मार्स गुरुकुल’ हा सहा महिन्यांचा कोर्स केला. त्यात त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं, त्याच्यानंतर मी अजून कस्टमर अँड करत गेलो. आज माझ्याकडे व्हीआयपी, सफारी, रोशन, आर्या असे अनेक कस्टमर आहेत. जेव्हा मी ‘मार्स गुरुकुल’ जॉईन केलं आणि जेव्हा सरांनी मला सांगितलं, की शिवाजी, तुम्ही तुमचं प्रॉपर कॉस्ट शीट मॅनेज केलं पाहिजे. तुमचा डॅशबोर्ड मेन्टेन केला पाहिजे. तुम्ही तुमचा प्लांटहेड, तुमच्या इथे मनपॉवर अपॉईंट कशी केली पाहिजे, त्यांना कामं कशी वाटून दिली पाहिजेत, तुम्ही तुमच्या कस्टमरसोबत कसं बोललं पाहिजे, तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरसोबत कसं बोललं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला सावंत सर, मराठे सर यांनी स्वतः बोट धरून शिकवल्या, कान धरून शिकवल्या, की कोविडच्या काळात आत्महत्या करायला निघालेला मी, केवळ सावंत सर, मराठे सर यांच्यामुळे आज दुसरं युनिट सुरू केलं. माझा १२ करोडचा टर्नओव्हर आहे. तो २०२३-२४ ला २५ कोटी करण्याचं लक्ष्य मी ठेवलं आहे. ते नुसतं बोलत नाहीत, तर ते करून घेतात. मागे लागून करून घेतात. सांगतात की तू असं नाही, असं केलं पाहिजे. चार-चार वेळेला फोन करतात. शाळेत शिक्षक जसं शिकवायचे, त्यासारखंच मराठे सर व सावंत सरांनी मला शिकवलं, वेळोवेळी गाईडलाईन दिली, वेळोवेळी यांनी मला कनेक्ट दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मालक म्हणून काय काम केलं पाहिजे. जे पूर्वी मी सकाळी लवकर फॅक्टरीमध्ये यायचो. १२-१२, १४-१४ तास काम करायचो. सर्व स्वतःचं काम स्वतः करायचो. हेल्परचा पगार मी करायचो, त्यांच्याशी मीच बोलायचो, ऑपरेटरसोबत मीच बोलायचो, माझ्या माणसांशी मीच बोलायचो. पण जेव्हा मला सरांनी सांगितलं, की ऍक्च्युली मालकाचं काम काय असतं, त्या वेळी मी शिकलो, की आपण काय करायला पाहिजे आणि आपण काय करतोय. आज मी माझं काम स्टाफकडून करून घेतो आणि मी फ्री असतो. कारण मी सरांनी दिलेल्या टिप्स, सरांनी दिलेलं मार्गदर्शन याच्यावर मी माझी टीम बिल्ड केली. माझ्या दोन्ही युनिटमध्ये मी प्लांटहेड लेव्हलची माणसं घेतली. ती माणसं काम करतात. त्यांना फक्त मी एक प्लॅनिंग देतो, रोज एक मीटिंग घेतो, अर्धा तास फक्त. आता सध्या तरी माझं काम एवढंच आहे, की मी कस्टमरला भेटणं, सप्लायरला भेटणं, माझ्या कॉन्टॅक्टरला भेटणं. बस्स आणि बाकी सगळं माझी माणसं मॅनेज करतात. ऑर्डर आणण्यापासून, मॅनेज करण्यापासून, फंड्स प्लॅनिंग करण्यापासून सगळ्या गोष्टी माझी माणसं करतात. फक्त मी माणसांना एकच सांगितलंय, की तुम्हाला जे काय करायचं आहे ते डिसिजन घेताना मला विचारा, करायचं तुम्हालाच आहे. त्यामुळे आज काय झालंय, की माझ्यावर कुणीही अवलंबून राहत नाही. मी आलो नाही तर हे काम होणार नाही, मी नसलो तर हे काम होणार नाही, असं होत नाही. प्रत्येक जण त्याचं त्याचं काम जबाबदारीनं करतो.
धन्यवाद!
– शिवाजी अहिरे

Get in Touch


14, Nyay Sagar, Old Nagardas Road, Near BJP Office, Andheri (East), Mumbai - 400 055.

+91 9820582183
