‘बिझनेसमध्ये मेंटॉरिंग, हँड होल्डिंग, प्रॉपर गायडन्स मिळावा, यासाठी मी मार्स जॉईन केलं. कारण सामान्य मराठी कुटुंबातून आल्यानंतर आपल्याला घरातून व्यवसाय किंवा बिझनेससंदर्भात कसलीच माहिती नसते. अशा वेळी कुणीतरी मार्गदर्शक हवा, कुणी वडीलधारं असायला पाहिजे, जे आपल्याला सर्व गोष्टी सांगतील. आपण जेव्हा स्वतः निर्णय घेतो आणि कृती करतो, तेव्हा खूप काही चुकाही घडतात. अजित सर आणि सावंत सर यांच्याबद्दल समजल्यावर मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं.
गेल्या दोन वर्षांपासून मी ‘मार्स’ बरोबर आहे. व्यवसायातल्या काही गोष्टींबाबत खूप सखोल जाऊन चर्चा करणं व मग योग्य ते निर्णय कसा घेणं, या सर्व प्रक्रियेत आम्हाला खूप फायदा झाला. जी गोष्ट करायला आम्हाला सात ते आठ वर्षं लागली असती, ती गोष्ट दोन ते तीन वर्षांत आम्ही करू शकलो.
टाइम मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंगच्या ‘मार्स’ च्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या नॉलेज मधून, त्यांच्या नेटवर्कमधून आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकायला व करायला मिळाल्या.
फक्त व्यवसायातच नाही, तर एक माणूस म्हणून, व्यवसायिक म्हणून, समाजात वावरताना एक आदर्श म्हणून आम्ही सरांकडे बघतो व त्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करतो. आम्हाला आयुष्यभरासाठी एक मार्गदर्शक मिळाला आहे.
– माधुरी कळंबटे (वृक्षवल्ली – रत्नागिरी)
Get in Touch
14, Nyay Sagar, Old Nagardas Road, Near BJP Office, Andheri (East), Mumbai - 400 055.