Testimonial Detail

श्रीकांत कुमावत


मी जेव्हा ‘मार्स गुरुकुल’ जॉईन केलं, तेव्हा मी प्रचंड आर्थिक अडचणीत होतो. आपलं नॉलेज अपडेट करावं आणि आपणही धंदा शिकावा म्हणजे परत आर्थिक अडचणीत येणार नाही, या उद्देशाने मी ‘मार्स गुरुकुल’ जॉईन करायचं ठरवलं. ‘मार्स गुरुकुल’ च्या फाउंडेशन बेसिक कोर्सला जॉईन झालो, त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बिझनेस कसा करतात, हे शिकायला मिळालं.
त्या कोर्सपूर्वी मी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होतो. सावंत सरांच्या भाषेत, माझी कंपनी राम भरोसे चालली होती, म्हणजे काम करत आहोत, पैसे येत आहेत, जात आहेत, काम करतोय, पैसे कसे येत आहेत, कसे जात आहेत, काहीच कळत नव्हतं. काहीच स्ट्रॅटेजी नव्हती, काही व्हिजन नव्हतं, काही मिशन नव्हतं.
कोर्सनंतर मी माझं व कंपनीचं व्हिजन बनवलं, मिशन बनवलं आणि त्याच्यावर आम्ही काम करतोय. जेव्हा मी फाउंडेशन कोर्स सुरू केला, तेव्हा माझ्या कंपनीचा टर्नओव्हर एक कोटी रुपये होता. मी फाउंडेशन कोर्स पूर्ण केला, त्यानंतर त्यांचा एकलव्य हा जो कोर्स आहे, त्याच्यात सर ‘वन-टू-वन’ शिकवतात, त्यालाही सरांनी सिलेक्ट केलं आणि तोही केला. आज माझा टर्नओव्हर तीन वर्षांत दहा कोटींपर्यंत पोहोचला आहे आणि हे फक्त ‘मार्स गुरुकुल’ चे अजित मराठे सर आणि राजेंद्र सावंत सर यांच्यामुळे साध्य झालं आहे.
त्यांनी नुसतं व्हिजन, मिशन सेट केलं नाही, तर गोल सेट केले. लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल, तीन वर्षांत कंपनीचा किती टर्नओव्हर झाला पाहिजे, पाच वर्षांत किती पाहिजे, दहा वर्षांत किती पाहिजे, हे सगळं सेट केलं. त्यांच्याबरोबर बसून एचआर पॉलिसी आम्ही फायनल केली. त्यामुळे प्रत्येक कर्मचार्याला माहिती आहे,आपल्याला किती सुट्ट्या आहेत, किती पेड सुट्ट्या आहेत, किती अनपेड सुट्ट्या आहेत, त्यामुळे एम्प्लॉइमध्येसुद्धा एक कॉन्फिडन्स आला.
त्याबरोबर सॅलरी इन्क्रिमेंटची प्रोसेस ठरवली. त्यांच्यासाठी KPI ( की परफॉर्मन्स इंडिकेटर) निश्चित केले. बिझनेस डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या स्ट्रॅटेजी लागतात, त्या त्या स्ट्रॅटेजी वेळोवेळी मराठे सर आणि सावंत सरांनी कंपनीत इम्प्लिमेंट केल्या. त्याच्यात काय अडचणी येतात,याचा दर पंधरा दिवसाला रिव्ह्यू होतो आणि त्या रिव्ह्यूमधून त्या अडचणींवर काय मार्ग काढता येईल , काय सोल्युशन आहे, हे सर्व ते सांगतात. म्हणूनच एक कोटीपासून दहा कोटी टर्नओव्हरवर कंपनी पोचली. एक कोटी टर्नओव्हर होता, तेव्हा माझ्यावर दोन कोटी रुपयांचं कर्ज होतं. अशी बिकट परिस्थिती होती. अशा स्थितीतून बाहेर यायचं असेल, तर ‘मार्स गुरुकुल’ला जायलाच हवं. प्रत्येकाच्या आयुष्यात मेंटॉर असलाच पाहिजे, असं माझं ठाम मत बनलेलं आहे. आता आमचं पुढचं टार्गेट आहे शंभर कोटींचा टर्नओव्हर करण्याचं. पुढच्या तीन ते चार वर्षात आम्हाला हे टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्यासाठीचा पण पाथ वे फिक्स झालेला आहे. पण त्यासाठीचा पाथ वे, दर महिन्याला, दर तिमा हिला, दर वर्षाला कशी कशी ग्रोथ झाली पाहिजे आणि त्या ग्रोथ आणण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे, हे सुद्धा क्लिअर आहे. हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे आणि त्यानुसारच आम्ही काम करतोय. ‘मार्स गुरुकुल’ मध्ये सगळ्यात जास्त चांगलं वाटलं ते हे, की सरांनी कधी कमर्शियल भावनेतून शिकवलं नाही. शंभर कोटींची उलाढाल करणारे शंभर उद्योजक घडवायचे हे ‘मार्स’ च मिशन आहे. दोघही सर २४ तास उपलब्ध असतात. त्यांना कधीही फोन करा, ते आपल्या ज्या समस्या असतात त्या सोडवण्यास तत्पर असतात. आम्ही आहो पाठीशी, तू लढ! बस्स एवढं जरी म्हटलं तरी आपल्याला निर्णय घ्यायला बळ मिळतं. पूर्वी निर्णय घेतानाच भीती वाटायची. आता ती पार गेली आहे. त्यांचा मी सदैव आभारी आहे. आणि इथून पुढे माझंच व्हिजन सरांनी असं तयार केलेलं आहे, की २०४० पर्यंत पाच हजार कोटींचा टर्नओव्हरपर्यंत पोचता येईल. ‘मार्स गुरुकुल’ च्या मदतीनच हे साध्य होणार आहे. पूर्वी माझी वन मॅन आर्मी अशी अवस्था होती. आता सिस्टिम आणि प्रोसेसमुळे खूपच जास्त फायदा झाला आणि वेळही काढता येतो. ‘मार्स गुरुकुल’ च्या पुस्तकासाठी माझ्या शुभेच्छा ! धन्यवाद सर!

Get in Touch


14, Nyay Sagar, Old Nagardas Road, Near BJP Office, Andheri (East), Mumbai - 400 055.

+91 9820582183
