मी रत्नागिरी इथे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गेली तीस
वर्षं काम केलं. यात निसान कार, वॉश कार या दोन
मोठ्या कंपन्यांबरोबर काम करताना, सिस्टिम सेल्सचे
धडे वारंवार मिळत होते. त्यामुळे व्यवसायातलं सर्व येतं,
असा माझा समज होता. एकदा ‘मार्स गुरुकुल’च्या मराठे
सरांचं सेमिनार सहज अटेंड केलं. अजून आपल्याला
खूप शिकावं लागेल, याची जाणीव त्यातून झाली. त्या
जाणिवेतून त्यांच्या ‘मिशन अभिमन्यू’ या कोर्स मध्ये मी भाग घेतला. सध्या आठ
महिने हा कोर्स नियमित करतो आहे. रोज नवं ज्ञान मिळत आहे. सिस्टिम, प्लॅनिंग,
मॉनिटरिंग यांमधले बारकावे प्रामुख्यानं समजले. मॅनेजमेंटमधल्या कोणत्याही
विषयातलं सखोल ज्ञान देण्याची ताकद यांच्यात आहे, हे प्रकर्षानं जाणवलं. मला
व आमच्या कंपनीला या ट्रेनिंगमधून खूप फायदा झाला. सरांचं या विषयातलं
पुस्तक प्रकाशित होत आहे, असं समजलं. हे पुस्तक बऱ्याच व्यावसायिकांना
ज्ञानरूपी प्रकाश देईल, याची खात्री आहे. त्यांच्या या कार्याला आमच्या हार्दिक
शुभेच्छा!
धन्यवाद!