Testimonial Detail

संग्राम लिमये

व्यवसाय मालक आणि उद्योजक



‘मार्स गुरुकुल’ बरोबर कोर्स करताना खूप गोष्टी शिकायला
मिळाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, व्यवसाय मोठा
करण्यासाठी सिस्टिम आणि प्रोसेसची आवश्यकता का
आहे, त्या कशा तयार करायच्या आणि त्यांचा वापर,
त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, यांसारख्या महत्त्वाच्या
गोष्टी अजित सर आणि सावंत सर यांच्याकडून शिकायला
मिळाल्या. त्याचप्रमाणे जेव्हा आपण व्यवसाय करत
असतो, तेव्हा आपल्याला जॉईंट व्हेंचर किंवा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करावा
लागतो किंवा काही स्पेशल प्रोजेक्ट काही लोकांबरोबर जाऊन करावे लागतात.
हे करत असताना कोणत्या फॉर्म्युल्यावर ही पार्टनरशिप तपासली पाहिजे,
त्याच्यासाठी एक विशिष्ट फॉर्म्युला सरांनी शेअर केला होता आणि त्या फॉर्म्युल्याचा
मला खूप जास्त उपयोग झाला. ‘मार्स गुरुकुल’ आणि इतर कोर्सेसच्या बाबतीत
मला एक फरक जाणवला, की इतर कोर्स घेणारे जे कोर्स कंडक्टर आहेत, ते ट्रेनर
आहेत किंवा मोटिव्हेशनल स्पीकर आहेत, ते स्वतः व्यावसायिक नाहीत. पण
राजेंद्र सावंत सर आणि अजित मराठे सर या दोघांनी अधिक व्यवसाय केलेले
आहेत. त्यात काहीवेळा त्यांना अपयशदेखील आलेलं आहे. त्यामुळे फर्स्ट हँड
एक्सपिरिअन्स त्यांच्याकडे आहे आणि व्यवसाय करत असताना काय अडचणी
येतात आणि तेव्हा काय मानसिकता असली पाहिजे, या बाबतीमध्ये ते अतिशय
अचूक मार्गदर्शन करतात आणि या कोर्सचं नाव आहे ते अगदी सार्थक करणारं
आहे, ‘फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड.’ या माध्यमातून ते व्यावसायिकांबरोबर
असतात आणि नुसती व्यावसायिकताच नाही, तर खासगी आयुष्यातदेखील काही
अडचणी आल्यानंतर हक्कानं आपण कधीही त्यांना फोन करू शकतो आणि
मोठ्या भावाप्रमाणे ते मार्गदर्शन करतात. हा माझा ‘मार्स गुरुकुल’च्या बाबतीतला
अनुभव आहे.
धन्यवाद!
संग्राम लिमये

Get in Touch


14, Nyay Sagar, Old Nagardas Road, Near BJP Office, Andheri (East), Mumbai - 400 055.

+91 9820582183
