नमस्कार,
माझ्या कंपनीचे नाव आहे प्रोस्पप्रोन इंडस्ट्रीज इंजिनीअरिंग.
आम्ही सलूनच्या खुर्च्या, पार्लरच्या खुर्च्या मॅन्युफॅक्चरिंग
करतो. नाशिकमधल्या अंबड इथे हा व्यवसाय आहे.
‘मार्स’ चं सहकार्य घेतल्यावर माझ्या व्यवसायात चार ते
पाच पट वाढ झाली. ‘मार्स’ मधल्या प्रशिक्षणानंतर आम्ही
स्पर्धकांचं विश्लेषण करण्यास शिकलो. आजही मी दर
तीन महिन्याला हे विश्लेषण करत असतो आणि त्याचा व्यवसायाला चांगला
फायदा झाला आहे.
आपला स्पर्धक हा आपला सर्वात मोठा गुरू आहे, हे मला सावंत सरांनी शिकवलं.
कॉम्पिटिशन असणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि स्पर्धकच तुमची मोठ्या
प्रमाणात ग्रोथ करतो. स्पर्धकांसोबत मैत्री ठेवली, संपर्क राखला, तर धंद्यात खूप
पुढे जाऊ शकतो, हे मला ‘मार्स गुरुकुल’ कडून शिकता आलं. ही मोठी गोष्ट कळली
आणि याच एका गोष्टीमुळे माझा बिझनेस ३६० डिग्री शिफ्ट झाला
धन्यवाद!