Testimonial Detail

अभिजीत सूर्यवंशी

उद्योजक आणि व्यवसाय मालक

नमस्कार,
न्यू इंडिया सेल्स कार्पोरेशन नावाची आमची फर्म धुळ्याला आहे. आम्ही वॉटर ट्रीटमेंट सेगमेंटमध्ये काम करतो. गेल्या २३ वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे. वॉटर प्युरिफायरमध्ये छोटे डोमेस्टिक, कमर्शियल, इंडस्ट्रियल सर्व प्रकारच्या वॉटर प्युरिफायर मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे. सेल्स आणि सर्व्हिस सेंटर हे दोन्ही आम्ही एकच छताखाली राबवत असतो. ‘मार्स गुरुकुल’ बद्दल सांगायचं झालं, तर २०१६ साली अजित मराठे सरांची आणि माझी भेट झाली. त्या भेटीनंतर २०१८-१९ मध्ये मी कोर्स जॉईन केला होता. त्यातून अनेक लाभ झाले. पूर्वी जे काम करत होतो त्यात आणि आता खूप मोठा फरक आहे. पूर्वी एक उद्योजक म्हणून मी फक्त एकटा काम करत होतो. टीमकडून योग्य ते आऊटपूट काढून घ्यायला अडचणी येत होत्या. आता प्लॅनिंग करून टीमला फक्त ते देतो. सरांनी सिस्टिम अँड प्रोसेसवर आमच्याकडून खूप काम करून घेतलं. त्यामुळे आमचा पूर्वीचा जो टर्नओव्हर ४०-४५ लाखांच्या आसपास
होता, तो पाच कोटींच्या आसपास झाला आहे. ‘मार्स
गुरुकुल’मुळे नेटवर्किंग झालं. छोट्या-मोठ्या अडचणींत सरांना कॉल केला, तर ते खूप छान पद्धतीनं त्याच्यावर सोल्युशन देतात. बिझनेसच नव्हे, तर बिझनेसच्या व्यतिरिक्त खूप अशा काही गोष्टींत जिथे आपण एक उद्योजक म्हणून घाबरून जातो, त्या ठिकाणी सरांबरोबर पाच मिनिटं जरी बोललो, तरी एक वेगळी एनर्जी येते, एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला मिळून जातं.
धन्यवाद!
– अभिजीत सूर्यवंशी
न्यू इंडिया संस्कार पोर्शन, धुळ

Get in Touch


14, Nyay Sagar, Old Nagardas Road, Near BJP Office, Andheri (East), Mumbai - 400 055.

+91 9820582183
