Book Description

*सन्मा.मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्योजकाला मार्गदर्शन करणाऱ्या मेंटाॅर पुस्तकाचे प्रकाशन.*

Link For Purchasing the Book

खेळात जसे यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शकाची मदत लागते तशीच उद्योजकाला त्याचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते. हीच गरज ओळखून उद्योजकाला मार्गदर्शन करणारे मराठीतील पहिले पुस्तक *मेंटाॅर* ची निर्मिती झाली. आज त्याचे प्रकाशन *सन्मा.मंत्री मंगलप्रभात लोढा* यांच्या हस्ते झाले. या शुभप्रसंगी पुस्तकाचे *लेखक डॉ. अजित मराठे व राजेंद्र सावंत यांच्याबरोबर शिर्डी संस्थांनाचे माजी अध्यक्ष व सुप्रसिद्ध विकासक डॉ.सुरेश हावरे, सुप्रसिद्ध उद्योजक दिपक घैसास, पथीक चे मोटिवेशनल ट्रेनर समीर सुर्वे  हे उपस्थित होते.

आपण जे काही शिकलो, आपले ज्ञान, अनुभव, नेटवर्क इतर उद्योजकांना मिळावे तसेच उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ‘तू लढ आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुझ्या मध्ये जबरदस्त क्षमता आहे’ असा विश्वास उद्योजकाला दिला तर तो यशस्वी होऊ शकतो. उद्योग ही कोणा एका समाजाची मक्तेदारी नाही, याच विचारावर उद्योजकाला मार्गदर्शन करण्यासाठी  *’मार्स गुरुकुल’* ची स्थापना झाली आहे. असे *मेंटाॅर* या पुस्तकाचे *लेखक डॉ. अजित मराठे* आणि *श्री. राजेंद्र सावंत* यांनी सांगितले.

उद्योगात यशस्वी व्यक्तीचे अनुकरण करणे फार महत्त्वाचे असते. जे करायचे ते सर्वोत्तम करा… कोणत्याही परिस्थितीत आयुष्यात पुढे जायचे, कोणी थांबवलं तरी थांबायचे नाही, जे काही ठरवले ते करून दाखवायचे. जीवनात मेहनतीला पर्याय नाही सतत स्वतःला बदलत राहायचे. असा सल्ला  *सन्मा.मंत्री मंगलप्रभात लोढा* यांनी दिला. तसेच *डॉ. सुरेश हावरे* यांनी उद्योजकांना सचोटी आणि विश्वासाने व्यवसाय करायचा चांगली टीम उभी करायची असा सल्ला दिला. आपण श्रीमंत झालो तर समाज श्रीमंत होईल समाज श्रीमंत झाला तर देश श्रीमंत होईल यासाठी स्वतः श्रीमंत झाले पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था येत्या काळात १० ट्रिलियन डॉलर एवढी होईल असा विश्वास *दिपक घैसास* यांनी व्यक्त केला. *मोटिवेशनल ट्रेनर समीर सुर्वे* यांनी व्यवसायात मेंटाॅर का गरजेचा असतो? याची अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. तसेच व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपले स्वभावदोष सुधारले पाहिजेतअसे सांगितले. या कार्यक्रमाला अनेक मराठी उद्योजक उपस्थित होते.

आपली पुस्तकाची प्रत मिळवण्यासाठी संपर्क : गायत्री +919820582183

Get in Touch

14, Nyay Sagar, Old Nagardas Road, Near BJP Office, Andheri (East), Mumbai - 400 055.

+91 9820582183

partner@marsgurukul.in

    Partner With Us

    This will close in 0 seconds

    Scroll to Top