‘बिझनेसमध्ये मेंटॉरिंग, हँड होल्डिंग, प्रॉपर गायडन्स मिळावा, यासाठी मी मार्स जॉईन केलं. कारण सामान्य मराठी कुटुंबातून आल्यानंतर आपल्याला घरातून व्यवसाय किंवा बिझनेससंदर्भात कसलीच माहिती नसते.
“डॉ. अजित मराठे आणि राजेंद्र सावंत सर हे माझे मार्गदर्शक आहेत हे माझे भाग्य आहे. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, माझ्या व्यवसायात एकूणच लक्षणीय वाढ झाली आहे.”
“मला माझा मित्र अभिजीत सूर्यवंशी कडून ‘मार्स गुरुकुल’ बद्दल माहिती मिळाली. मी मार्स गुरुकुलमध्ये सामील झालो आणि दोन वर्षांत माझ्या व्यवसायाची उलाढाल २८-३० लाख रुपयांनी वाढली.”
“जेव्हा मी मार्स गुरुकुलमध्ये सामील झालो तेव्हा मला खूप आर्थिक अडचणी येत होत्या. माझे ज्ञान वाढवण्यासाठी आणि व्यवसाय धोरणे शिकण्यासाठी मी नोंदणी करण्याचा निर्णय घेतला.”
मी रत्नागिरी इथे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गेली तीस वर्षं काम केलं. यात निसान कार, वॉश कार या दोन मोठ्या कंपन्यांबरोबर काम करताना, सिस्टिम सेल्सचे धडे वारंवार मिळत होते.
‘मार्स गुरुकुल’ मुळे माझ्या व्हिजन, मिशनमध्ये क्लॅरिटी आली. माझा नेमका क्लाएंट कोण, हे ओळखता येऊ लागलं. त्यामुळे माझ्या बिझनेसवर सकारात्मक परिणाम झाला.
‘मार्स गुरुकुल’ बरोबर कोर्स करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, व्यवसाय मोठा करण्यासाठी सिस्टिम आणि प्रोसेसची आवश्यकता का आहे, त्या कशा तयार करायच्या आणि त्यांचा वापर, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी अजित सर आणि सावंत सर यांच्याकडून शिकायला मिळाल्या.
मी जेव्हा ‘मार्स गुरुकुल’ जॉईन केलं, तेव्हा माझ्याकडे एकच कस्टमर होता. मला सावंत सर, मराठे सर एकच सांगायचे, की शिवाजी, तू बॅग बिझनेसमध्ये काम करतोय. नंतर मी त्यांचा ‘मार्स गुरुकुल’ हा सहा महिन्यांचा कोर्स केला.
नमस्कार, न्यू इंडिया सेल्स कार्पोरेशन नावाची आमची फर्म धुळ्याला आहे. आम्ही वॉटर ट्रीटमेंट सेगमेंटमध्ये काम करतो. गेल्या २३ वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे. वॉटर प्युरिफायरमध्ये छोटे डोमेस्टिक, कमर्शियल, इंडस्ट्रियल सर्व प्रकारच्या वॉटर प्युरिफायर मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे.
‘मार्स गुरुकुल’ बरोबर काम करताना एक सगळ्यात मोठा फायदा हा झाला, की सिस्टिमकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. कोणत्या गोष्टी मॉनिटर करता आल्या पाहिजेत ते समजलं.
“अजित मराठे सर आणि राजेंद्र सावंत सर यांच्याकडून मी व्यवसाय करण्याची एक नवीन पद्धत शिकलो. त्यांनी मला ट्रॅक शीट कशी तयार करायची आणि कशी देखभाल करायची हे शिकवले. त्यांनी मला लक्ष्य निश्चित करण्याबाबत मार्गदर्शन केले.”